३० जानेवारी पूर्वी माझ्या साकेत गृह संकुलसंबंधी केलेल्या तक्रारींचे निराकरण करावे अन्यथा महाराष्ट्राच्या आदर्श उपविधींना व MCS Act ना तिलांजली देण्याचे आंदोलन करण्यात येईल
दयानंद नेने - सहकारसुत्र* जानेवारी १९, २०२१ प्रति, उपनिबंधक, सहकारी गृहनिर्माण संस्था, ठाणे शहर, ठाणे. *विषय: ३० जानेवारी पूर्वी माझ्या साकेत गृह संकुलसंबंधी केलेल्या तक्रारींचे निराकरण करावे अन्यथा महाराष्ट्राच्या आदर्श उपविधींना व MCS Act ना तिलांजली देण्याचे आंदोलन करण्यात येईल साहेब, साकेत गृहसंकुल, ठाणे या मी राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या कारभारात चालणाऱ्या गोंधळाविषयी गेल्या ५ वर्षात मी आपल्या कार्यालयात सतत पाठपुरावा करत आहे. आपल्या कार्यालयाने गेल्यावर्षी सोसायटी वर inspection सुद्धा लावले होते. पण त्यानंतर कोविड महामारी आणि लोकडाऊन झाले व तो विषय तसाच रेंगाळून राहिला आहे. सोसायटी च्या कारभारात सुधारणा व्हावी यासाठी ५ वर्षे आपल्या कार्यालयात मी दाद मागत आहे पण काही न्याय मिळाला नाही. याला कारण आपले भ्रष्ट्र अधिकारी असे समजायचे का? आमच्या सोसायटी चे पदाधिकारी बिनधास्तपणे कायदा आणि उपविधी यांची सातत्याने पायमल्ली करत आले आहेत आणि आपल्या कार्यालयातून माझ्या तक्रारींचे होणारे हेळसांड त्यांना अधिक बळ देते. हा काय करू शकणार? अशी भावना त्यांच्या मनात ठाम झाली आह...