३० जानेवारी पूर्वी माझ्या साकेत गृह संकुलसंबंधी केलेल्या तक्रारींचे निराकरण करावे अन्यथा महाराष्ट्राच्या आदर्श उपविधींना व MCS Act ना तिलांजली देण्याचे आंदोलन करण्यात येईल
दयानंद नेने - सहकारसुत्र*
जानेवारी १९, २०२१
प्रति,
उपनिबंधक,
सहकारी गृहनिर्माण संस्था,
ठाणे शहर, ठाणे.
*विषय: ३० जानेवारी पूर्वी माझ्या साकेत गृह संकुलसंबंधी केलेल्या तक्रारींचे निराकरण करावे अन्यथा महाराष्ट्राच्या आदर्श उपविधींना व MCS Act ना तिलांजली देण्याचे आंदोलन करण्यात येईल
साहेब,
साकेत गृहसंकुल, ठाणे या मी राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या कारभारात चालणाऱ्या गोंधळाविषयी गेल्या ५ वर्षात मी आपल्या कार्यालयात सतत पाठपुरावा करत आहे.
आपल्या कार्यालयाने गेल्यावर्षी सोसायटी वर inspection सुद्धा लावले होते. पण त्यानंतर कोविड महामारी आणि लोकडाऊन झाले व तो विषय तसाच रेंगाळून राहिला आहे.
सोसायटी च्या कारभारात सुधारणा व्हावी यासाठी ५ वर्षे आपल्या कार्यालयात मी दाद मागत आहे पण काही न्याय मिळाला नाही.
याला कारण आपले भ्रष्ट्र अधिकारी असे समजायचे का?
आमच्या सोसायटी चे पदाधिकारी बिनधास्तपणे कायदा आणि उपविधी यांची सातत्याने पायमल्ली करत आले आहेत आणि आपल्या कार्यालयातून माझ्या तक्रारींचे होणारे हेळसांड त्यांना अधिक बळ देते.
हा काय करू शकणार? अशी भावना त्यांच्या मनात ठाम झाली आहे. आपले कार्यालय manage करता येते अशा गमजा ते सर्वत्र मारतात.
दोन्ही बाजूंनी वाजवता येतील इतक्या मोघम आणि vague अशा या उपविधी - ज्यांचा activists ना काही उपयोग होत नाही,
उपनिबंधक कार्यालय आणि तेथील अधिकारी यांची अपारदर्शक वर्तणूक व भोंगळ कारभार,
जिसकी लाठी उसकी भैस - या तत्वावर चालणारा कारभार - म्हणजे समजून घ्या,
तक्रारदाराला नाउमेद करणारी आणि झक मारली आणि तक्रार केली अशी दिली जाणारी वागणूक,
जी गोष्ट उपनिबंधक कार्यालयाची तीच गोष्ट DSA कार्यालयाची.
ज्या कायद्या ला दात च नाहीत तो काय न्याय देणार ?
पुन: ऑडिट चा अर्ज केला की आधी पैसे भरा..
ह्या असल्या वांझोट्या उपविधी हव्यात कशाला?
(*आपणास मी आमच्या साकेत गृह संकुलाचे गेल्या ५ वर्षातले सर्व कागद पाठवले आहेत.
नजरेखालून घातलेत तर मी काय म्हणतोय ते कळेल* किती हेराफेरी आणि काय काय!
सदर गोष्टींचा पाठपुरावा केला तर काही लोकांना त्रास होऊ शकतो !)
असो.
अत्यंत नैराश्याने नमूद करतो की या भ्रष्ट यंत्रणेच्या पुढे मी हरतोय.
आपणास विनंती करतो की येणाऱ्या जानेवारी ३०, २०२१ पूर्वी आपण माझ्या तक्रारींचे ठोस निराकरण करावे अन्यथा गांधीजी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून आम्हाला आदर्श उपविधी आणि MCS Act यांना तिलांजली देण्याचे आंदोलन छेडावे लागेल.
आपला,
दयानंद नेने
● अध्यक्ष, सहकारसुत्र
● सतर्क नागरिक फौंडेशन
प्रत:
१) मा. जीतेंद्र आव्हाड साहेब, (सन. मंत्री महोदय)
महाराष्ट्र शासन
- न्याय मिळवून देण्यासाठी हात जोडून विनंती
2) Adv Shreerang Mulye, (Bombay High Court)
Comments
Post a Comment