अभिनंदन व शुभेच्छा
ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया
ए७/३०३, साकेत गृहनिर्माण संस्था, साकेत मार्ग, ठाणे (प) ४००६०१ # ८८७९५२८५७५
12/1/18
प्रति,
प्रति,
आ. आयुक्त,
ठाणे महानगरपालिका,
ठाणे
श्री संजीव जयस्वाल साहेब,
सप्रेम नमस्कार,
आज आपल्याला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळून तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
आपल्या सारखा धडाडी चा आयुक्त ठाणे शहराला लाभला हे शहराचे भाग्य आहे.
रस्ते रुंदीकरण, स्वच्छता मोहीम, भिंती रंगवा उपक्रम, वायफाययुक्त स्मार्ट ठाणे, या साठी आपण राबवलेल्या मोहिमांचे ठाणेकरांकडून सातत्याने स्वागत झाले आहे.
घोडबंदरपासून दिव्यापर्यंत शहरातील लेडीज बार, लॉज, अवैध धंद्यांचे शेकडो अड्डे महापालिकेने जमीनदोस्त केल्यामुळे या कारवाईचे सर्वत्र स्वागतच झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली आहे.
ॲलर्ट सिटीझन्स फोरम सुद्धा आपले सर्व उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अग्रेसर राहिला आहे.
आपल्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होवो अशी भविष्यासाठी शुभेच्छा.
आपले हितचिंतक,
ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया साठी,
दयानंद नेने. प्रसाद बेडेकर
अध्यक्ष. सचिव.
ॲलर्ट सिटीझन्स टीम : जितेंद्र सातपुते, प्रमोद दाते, CS संध्या मल्होत्रा, किरण जोशी, गणेश अय्यर, परिक्षित धुमे, वैभव खोत.
Comments
Post a Comment