वाढीव एन ए करा बाबत.
ALERT CITIZENS FORUM OF INDIA
A7/303, Saket CHS Ltd., Thane (W), 400601 # 8879528575.
------------------------------ ------------------------------ ------
२१ फेब्रुवारी, २०१८.
प्रति,
कलेक्टर साहेब,
ठाणे शहर व जिल्हा,
ठाणे.
विषय: वाढीव एन ए करा बाबत.
------------------------------ -------------------
महोदय,
२०१७ -१८ या आर्थिक वर्षासाठी आपल्या कार्यालयातून विविध गृहनिर्माण संस्थांना अव्वा च्या सव्वा दराने एन ए कर आकारणी ची बिले पाठवण्यात आली आहेत अशा तक्रारी लोकांनी आमच्या कडे केल्या आहेत.
उदाहरणार्थ आम्ही राहतो त्या साकेत गृहनिर्माण संकुलाला गेल्या वर्षी पर्यंत ₹ ९०,०००/- एन ए कर आकारला जायचा त़ो यावर्षी एकदम ₹ १९ लाख एवढा आकारण्यात आला आहे.
एवढा मोठा कर भरणे आमच्या सोसायटीच्या आवाक्या बाहेर चे आहे.
तरी याबाबत त्वरित स्पष्टीकरण द्यावे व सदर कर कमी करून द्यावा ही विनंती.
त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सदर एन ए कर ५ % वरून कमी करून ०.५% एवढा केल्याची घोषणा मा. महसूल मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती व जुनी बिले रद्द करून नवीन बिले लवकरच पाठवली जातील अशी माहिती आमदार श्री. आशिष शेलार यांनी दिली होती.
याबाबत सुद्धा माहिती देण्यात यावी ही विनंती.
आपला,
ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया साठी,
दयानंद नेने. प्रसाद बेडेकर
अध्यक्ष. सचिव.
प्रत: १) मा. नामदार श्री.चंद्रकांतदादा पाटील,
महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य.
२) आमदार श्री. आशिष शेलार,
अध्यक्ष, भाजपा, मुंबई.
3) आमदार श्री. संजय केळकर,
ठाणे शहर
Comments
Post a Comment