विटावा सब - वे येथे नित्कृष्ट दर्जाचे दुरुस्ती काम - ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया ने केला निषेध, संबंधित कंत्राटदारावर कारवाई ची मागणी.
ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया
A7/303, Saket CHS Ltd, Saket Marg, Thane (W) 400601. # 8879528575
______________________________ _________________
डिसेंबर २६, २०१७
प्रति,
सन्माननीय आयुक्त,
ठाणे महानगरपालिका,
ठाणे.
महोदय,
विषय : विटावा सब - वे येथे नित्कृष्ट दर्जाचे दुरुस्ती काम - ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडियाचा निषेध, संबंधित कंत्राटदारावर कारवाई ची मागणी.
______________________________ ______________
विटावा सब - वे येथे गेले ४ दिवस, सब वे वाहतुकीसाठी बंद करून तेथील रस्त्यावर दुरुस्ती काम व पेव्हर ब्लॉक बसवून तो रस्ता मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
मात्र सदर कंत्राटदाराने अतिशय नित्कृष्ट दर्जाचे दुरुस्ती काम केल्याचा आढळून आले आहे.
ॲलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया याबाबत आपला निषेध नोंदवत असून संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणीही करतं आहे.
सुमारे चार दिवसांच्या ब्रेक नंतर विटावा रेल्वे ब्रीजखालील रस्ता आज सकाळी वाहनांसाठी खुला करण्यात आला खरा. मात्र, ज्या पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी इथे चार दिवस अन रात्र काम सुरु होते, तेच आता पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी उखडले गेल्याचे चित्र आहे.
( संबंधित फोटो पहा).
आज सकाळी केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला. अवजड वाहनांसाठी अजूनही वाहतूक सुरु केलेली नाही.
ही अवजड वाहनांची वाहतूक सुरु होण्याआधीच काही तासांच्या अवधीतच हे पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने इथल्या कामाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
पाच दिवस लोकांना वेठीस धरून, त्रास सहन करायला लावून असले नित्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी व त्याला त्वरित काळ्या यादीत - Black list - मध्ये टाकावे अशी मागणी ॲलर्ट सिटीझन्स फोरम करीत आहे.
त्याच प्रमाणे संबंधित कामाचे निरीक्षण करणार्या पालिका अधिकाऱ्यांवर सुद्धा लापरवाही ची कारवाई करावी अशी मागणी ॲलर्ट सिटीझन्स फोरम करीत आहे.
आपले सहकार्येच्छूक,
ॲलर्ट सिटीझन्स फोरम साठी,
दयानंद नेने. प्रसाद बेडेकर
अध्यक्ष. सचिव
Comments
Post a Comment