धन्यवाद आयुक्त संजीव जयस्वाल साहेब.
धन्यवाद आयुक्त संजीव जयस्वाल साहेब.
ठाणे महापालिकेच्या विविध विभागाच्या वतीनं करण्यात येणा-या कामाशी संबंधित सर्व दस्तऐवज, नस्ती महापालिकेच्या संकेतस्थळावर पहायला मिळणार आहेत.
महापालिका आयुक्तांनी तसा निर्णय घेतला असून येत्या १ जून पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणा-या विविध कामांविषयी लोकप्रतिनिधी, नागरिक तसंच माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली जाते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार यापुढे पहिल्या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या नस्ती, दुस-या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतची सर्व प्रक्रिया तर तिस-या टप्प्यात कार्यादेश दिल्यानंतरच्या सर्व प्रक्रियांचे दस्तऐवज १ जून पासून महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्याचबरोबर नविन नियुक्ती, माहिती अधिकारात देण्यात आलेली माहिती, प्रशासकीय आदेश, अपिलीय अधिका-यांकडून घेण्यात आलेल्या सुनावण्या याची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
आयुक्तांच्या या निर्णयाचे अलर्ट सिटीझन्स फोरम चे अध्यक्ष श्री दयानंद नेने यांनी स्वागत केले आहे.
यानिमित्ताने ठाणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दयानंद नेने
अलर्ट सिटीझन्स फोरम
Comments
Post a Comment