होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...
मित्रांनो, काल साकेत सोडून गेलेल्या काही मित्रांबरोबर भेट ठरली होती.
गप्प्पा रंगल्या व अचानक एकाने प्रश्न विचारला की दयानंद, 2 वर्षांपूर्वी तू ज्यांना
आपले समजत होतास त्यांनी तुझा विश्वासघात केला साथ सोडली - तुला एकटा पाडलं -तेव्हा तुला काय वाटले - तू ते दिवस कसे काढलेस?
मी म्हटले की शेवटी सर्व तुमचे कर्म (karma) आहे.
आपल्या प्रत्येकात एक कुरूप पिल्लू दडलेले असते..
अनेकदा वाटायचे की आपण डावलले जातोय, कोणीही सोम्या गोम्या येतोय..
त्यावेळी अनेकदा ही भावना कुरूप बदकाच्या पिल्लाप्रमाणे मान वर काढायची..
अचानक एक दिवशी ग दि माडगूळकरांचे हे गीत वाचण्यात आले.
मनाला खात्री पटली की हे गीत माझ्यासाठीच लिहिले आहे व आपल्यातील राजहंस लोकांना एक दिवस नक्की दिसेल हा विचार मनाला उभारी द्यायचा आणि वाटायचे की नैराश्य फेकून नेटाने जे काम हाती घेतलं ते पुर कर..
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले,
तो राजहंस एक
(कवी : ग दि मा )

Comments
Post a Comment