साकेत परिसरतर्फे सुहास देसाई ना Jewel of Thane पुरस्कार

आजच्या झेंडा वंदन कार्यक्रमाला स्थानीय नगरसेवक सुहास देसाई व सौ अंकिता शिंदे यांना निमंत्रण देऊन एक चांगला निर्णय साकेत चे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी घेतला त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.
विशेष म्हणजे "हे election year आहे ", त्यामुळे फक्त बीजेपी च्याच लोकांना बोलवायचे अशा भंपक pressure ना ते बळी पडले नाहीत हे विशेष आणि महत्वाचे.
इथे एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती  सर्वांनी समजली पाहिजे : साकेत हे कोणा एका पक्षाला आंदण दिलेले नाही.
हे मी 30 वर्षांपासून बीजेपी चा असून म्हणत आहे.
साकेत मध्ये सर्व पक्षीय व विविध विचारांची माणसे राहतात.
One has to respect all of them. 
केवळ आपल्याला  हातात काही काळ /वर्ष सत्ता - जबाबदारी मिळाली म्हणून मनमानी करायची, एका गटाला ignore करायचे, वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा काही काळ यशस्वी होतो, कायम नाही.
उलट अशा पद्धतीने तुम्ही आपला मनाचा कद्रूपणा दाखवता.
सुहास देसाई जनतेने निवडून दिलेले आपल्या वॉर्ड चे नगरसेवक आहेत.
ते त्यांच्या पार्टीचे निवडणुकीपूर्वी होते.
निवडून आल्यावर ते सर्व जनतेचे आहेत.
आणखी एक गोष्टीचे भान ठेवले पाहिजे.
आपल्या वॉर्डातले काम करायला मोदी किंवा फडणवीस येणार नाहीत.
तिथे स्थानीय नगरसेवक - म्हणजे सुहास देसाई च कामी येणार.
गेल्या 7 वर्षात त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत, त्याची सूची वेगळी देत आहे.
त्याबद्दल धन्यवाद म्हणून - आम्हाला तुमच्या contribution ची जाणीव व कदर आहे ही पावती देण्यासाठी आज त्यांना Jewel of Thane पुरस्कार दिला आहे.

- दयानंद नेने  - देविदास सवाई.








सुहास देसाई यांनी केलेली महत्वाची कामे :
1) जेष्ठ नागरिक id कार्ड वितरण व वैद्यकीय कॅम्प 
2) आधार कार्ड शिबीर 
3) सलग 4वर्ष शरद पूर्णिमा निमित्त माता की चौकी 
4) सतत डास निर्मूलन करण्यासाठी फवारणी 
5) साकेत साठी 12 मोठे कचऱ्याचे डबे व निर्माल्य कलश उपलब्ध करून देणे 
6) साकेत व महालक्ष्मी मंदिर येथे 25 बेंच 
7) साकेत road व parisar येथे LED लाईट 
8) Open Air Gym 
9) 24 बिल्डिंग चे ओव्हरहेड वॉटर टॅंक सफाई 
10) जेष्ठ नागरिकांसाठी पिकनिक 
11) साकेत ते स्टेशन tmt bus सेवा 
12) 4 वर्षे रस्ता डांबरीकारण 
13) बालोद्यान व नाना नानी पार्क चे नूतनीकरण 

14) आता 2 मोठ्या रस्त्यांचे कॉंक्रेटीकरण

Comments

Popular posts from this blog

Code of Conduct for Repairs and Renovation of Members Flats in Saket CHSL.

Society cannot charge or demand money / donation for the Cultural/Festival Expenses from their members/residents.

Introduction to the concept of Antyodaya of Pandit Deendayal Upadhyay