महाराष्ट्राच्या आदर्श उपविधींना तिलांजली देण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण*
*दयानंद नेने - सहकारसुत्र*
ऑगस्ट २८, २०१९
मा. सुभाषराव देशमुख जी,
सहकारमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई 400 032
*विषय: महाराष्ट्राच्या आदर्श उपविधींना तिलांजली देण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण*
साहेब,
सहकारसुत्र या आमच्या एन जी ओ तर्फे अनंत चतुर्थी च्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी असलेल्या आदर्श उपविधींना तिलांजली देण्याच्या कार्यक्रमात आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची कृपा करावी.
सदर कार्यक्रम दि. १२ सप्टेंबर, २०१९ रोजी नरिमन पॉईंट येथे समुद्र किनारी सकाळी ११.३० वाजता घेण्यात येईल.
दोन्ही बाजूंनी वाजवता येतील इतक्या मोघम आणि vague अशा या उपविधी - ज्यांचा activists ना काही उपयोग होत नाही,
उपनिबंधक कार्यालय आणि तेथील अधिकारी यांची अपारदर्शक वर्तणूक व भोंगळ कारभार,
जिसकी लाठी उसकी भैस - या तत्वावर चालणारा कारभार - म्हणजे समजून घ्या,
तक्रारदाराला नाउमेद करणारी आणि झक मारली आणि तक्रार केली अशी दिली जाणारी वागणूक,
जी गोष्ट उपनिबंधक कार्यालयाची तीच गोष्ट DSA कार्यालयाची.
ज्या कायद्या ला दात च नाहीत तो काय न्याय देणार ?
पुन: ऑडिट चा अर्ज केला की आधी पैसे भरा..
ह्या असल्या वांझोट्या उपविधी हव्यात कशाला?
(*आपणास मी आमच्या साकेत गृह संकुलाचे गेल्या ४ वर्षातले सर्व कागद पाठवले आहेत.
नजरेखालून घातलेत तर मी काय म्हणतोय ते कळेल* किती हेराफेरी आणि काय काय!
सदर गोष्टींचा पाठपुरावा केला तर काही लोकांना त्रास होऊ शकतो !)
असो.
१२ सप्टेंबर रोजी अवश्य यावे. मीडिया येणारच आहे.
आपल्या पक्षातल्या जुन्या आणि जेष्ठ कार्यकर्त्यांची एवढी मागणी मान्य करावी.
आपला,
दयानंद नेने
● भारतीय जनता पार्टी, मुंबई
● अध्यक्ष, सहकारसुत्र
प्रत: मा. मुख्यमंत्री साहेब,
- चंद्रासारख्या सुंदर आपल्या शासनावर हा एक डाग आहे..
२) मा. महसूल मंत्री साहेब
- दादा, तुम्हाला सर्व माहिती आहे.. तत्पूर्वी आपण एक संयुक्त बैठक घ्यावी ही विनंती.
३) मा. श्री सतीश मराठे जी,
● संस्थापक: सहकार भारती
● संचालक: रिझर्व बँक
- कायद्यात अजून सुधारणा केल्या पाहिजेत..
Comments
Post a Comment