मालमत्तेचे अभिहस्तांतरण ( Property Conveyance)* आणि *मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण ( Property Deemed Conveyance )* म्हणजे काय ?
मालमत्तेचे अभिहस्तांतरण ( Property Conveyance)* आणि *मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण ( Property Deemed Conveyance )* म्हणजे काय ? या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत.
*मालमत्तेचे अभिहस्तांतरण*
को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील सदनिका आपल्या नावावर असते. परंतु ज्या जमिनीवर ती सोसायटी/बिल्डिंग उभी आहे त्या जमिनीचे मालक सोसायटी नसते. सदर जमीन बिल्डर /प्रमोटर/जागा मालक यांच्या नावावर असते. तर बिल्डर /प्रमोटर/जागा मालक यांनी स्वतःहून सदर जमिनीचा मालकी हक्क त्या हाऊसिंग सोसायटी च्या नावे हस्तांतरित करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला मालमत्तेचे अभिहस्तांतसरण म्हणतात.
*मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण**
को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नोंदणीकृत झाल्यानंतर 4 महिन्यांचे आत बिल्डर ने सदर सोसायटीच्या नावे मालमत्तेचे अभि हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. परंतु तसें अभिहस्तांतरण करून नाही दिले तर सदर मालमत्तेचे अभि हस्तांतरण सोसायटी च्या नावे करून देण्याचे हक्क शासनाने आपल्याकडे अबाधित ठेवले आहेत. शासनाने अश्याप्रकारच्या हक्काचा उपयोग करून मालमत्तेचे हस्तांतरण सोसायटीच्या नावे करून देण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला मानीव अभिहस्तांतरण म्हणतात.
*अभिहस्तांतरण /मानीव अभिहस्तांतरणाचे फायदे*
1)सोसायटी सदर जमिनीची कायदेशीर मालक होते.
2) डेव्हलपमेंट रेगुलेशन मध्ये बदल झाल्यामुळे जो काही अधिकतम एफ. एस. आय. मिळेल तो शाबूत राखण्याच्या दृष्टीने सोसायटी सक्षम होते.
3) बिल्डिंगच्या डागडुजी तसेच पुनर्बांधणी साठी सोसायटी सदरची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज घेऊ शकते.
4) सोसायटी सदर बिल्डिंगच्या पुनर्बांधणी साठी सक्षम प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त करून घेऊ शकते.
5) सोसायटी सदर बिल्डिंगचा पुनर्विकास /स्वयंपुनर्विकास करू शकते आणि त्या अनुषंगाने सदस्यांना अतिरिक्त चटईक्षेत्र, कॉर्पस फंड, अमेनिटीज , मिळू शकतात.
6) सोसायटी
टेली कम्म्युनिकेशन टॉवर, जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी देऊन त्या अनुषंगाने सोसायटीला अतिरिक्त मिळकत होऊ शकते.
मानीव अभिहस्तांतरण करून घेण्यासाठी खालील कागद पत्रांची आवश्यकता असते.
1) सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
2) सोसायटी सदस्यांची यादी आणि त्यांच्या शेअर सर्टिफिकेट बद्दलची माहिती
3) सर्व सदनिकांच्या नोंदणीकृत करारपत्राची प्रत्येकी एक प्रत ( चेन ऑफ अग्रीमेंटची प्रत्येकी एक प्रत )
4) प्रत्येक सदनिकेची स्टॅम्पड्युटी भरल्याची व इंडेक्स क्रमांक 2 ची प्रत
5) सदनिका मालकाचा /जागा मालकाचा मृत्यू झाला असल्यास त्या संदर्भातील मृत्यू दाखला
6) सर्व सदनिकांच्या मालकी हक्क हस्तांतरणाविषयी अभिलेख
7) विकासकाची भागीदारी संस्था असल्यास किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एल एल पी असल्यास त्या संदर्भातली कागदपत्रे
8) जागामालक आणि विकासक यांच्या मधील जागा अभिहस्तांतराचे दस्तऐवज /करारनामे यांची प्रत
9) जागामालकानी विकासकाच्या नावाने कुलमुखत्यारपत्र केले असल्यास त्याची प्रत
10) जागेचा 7/12 उतारा
11) 6 अ चा उतारा
12) मालमत्तापत्राची प्रत
13) सिटी सर्वे मॅप
14) मालमत्ता नॉन ऍग्रीकल्चर असल्यासंबंधीचे आदेश
15) यू एल सी ऑर्डर
16) मालमत्ताकर भरल्याची पावती
17) बी. एम. सी. कडून मान्यताप्राप्त प्लॅन ची प्रत
18) आय ओ डी ची प्रत
19) कॅमेन्समेंट सर्टिफिकेट
20) ऑक्युपेशन सर्टिफिकेट
21) बिल्डिंग पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट
22)लोकेशन मॅप
23) आर्किटेक्ट कडून घेतलेला सर्वे रिपोर्ट
24) वकीलांकडून घेतलेला मालमत्तेच्या हक्का संबंधी दाखला
Comments
Post a Comment