📢 *महत्वाची माहिती*
• गेल्या आठवड्यात मी तुम्हाला कळवले होते की महाराष्ट्र सरकार कसे ज्या जुन्या इमारतींना OC नाही त्यांच्यासाठी 2 ऑक्टोबर पर्यंत एक नवी अभय योजना जाहीर करणार आहे.
• प्रारंभी ही योजना मुंबई साठी असेल आणि नंतर ती ठाणे, पुणे अशी इतरत्र अंमलात येईल.
• मुंबईतील इमारतींना / सोसायट्यांना *Occupancy Certificate (OC)* मिळण्यात होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांना *महापालिकेचा जास्त मालमत्ता कर (Property Tax)* व *पाणीपट्टी (Water Tax)* भरावा लागतो. या संदर्भात एक *महत्वाची उच्चस्तरीय बैठक* घेण्यात आली.
या बैठकीस *नगरविकास सचिव श्री. असीम गुप्ता*, *उपसचिव श्री. निर्मल चौधरी (UDD)* आणि *श्री. गिटे* उपस्थित होते. ही बैठक *माजी खासदार श्री. गोपाल शेट्टी* यांच्या विनंतीवरून आयोजित करण्यात आली होती.
*श्री. अमित सटम*, अध्यक्ष, भाजपा मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या *भाजपा मुंबई OC समिती*च्या सदस्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.
या महत्वाच्या बैठकीस *आर्किटेक्ट श्री. अरविंद नांदापुरकर*, *अॅड. अमित मेहता* उपस्थित होते.
मी पुण्यात असल्यामुळे या बैठकीला जाऊ शकलो नाही.
📌 लवकरच *मुंबईकरांसाठी एक “Amnesty Scheme”* जाहीर होणार आहे.
या योजनेत पहिल्या *सहा महिन्यांत अर्ज केल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा दंड आकारला जाणार नाही*.
मुंबई नंतर ही योजना ठाणे, पुणे अशी इतरत्र राबवली जाईल.
-- दयानंद नेने
Comments
Post a Comment