*Update on OC policy progress - today's meeting - Ashish Shelar*
मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र(ओसी) न मिळालेल्या सुमारे 22 हजार इमारतींना दिलासा मिळावा म्हणून शासन एक धोरण तयार करीत असून हे धोरण सर्वंकष व्हावे, इमारतीला ओसी नसल्याने गेले अनेक वर्षे यातना भोगणाऱ्या जास्तीत जास्त मुंबईकरांना या धोरणातून दिलासा मिळावा म्हणून धोरणाच्या मसूद्यावर आज सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या मसुद्यातील एक एक मुद्द्यांवर आज सविस्तर चर्चा या बैठकीत केली. काही सुधारणा व सूचना देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
या बैठकीस माजी खासदार गोपाळ शेट्टी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई अपर मुख्य सचिव असिम कुमार गुप्ता, एसआरएसचे कार्यकारी अभियंता राजाराम पाटील, आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
.....................................
Convened a meeting today to review in detail the draft government policy aimed at providing relief to nearly 22,000 Mumbai buildings still awaiting Occupancy Certificates (OCs). The policy seeks to ensure that maximum relief reaches residents who have endured years of hardship due to the absence of an OC. Every point in the draft was carefully deliberated and constructive suggestions and improvements were conveyed to the concerned departmental officials.
Former MP Shri Gopal Shetty, BMC Commissioner Bhushan Gagrani, Additional Commissioner Abhijit Bangar, SRA Additional Chief Secretary Asim Kumar Gupta, Executive Engineer of SRA Rajaram Patil, and officials from concerned departments.
#Maharashtra #AshishShelar
Comments
Post a Comment