सदनिकाधारकांनो - Flat owners - तुम्ही जमीनमालक आहात ? (लोकहितार्थ प्रसारित )
प्रिय साकेतवासियांनो, स्वत:च्या मालकीचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी तो पै-पैसा वाचवून बिल्डरला देतो व सदनिका घेतो. अशा सदनिका धारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट स्थापन करून नोंदणी करणे व त्या संस्थेच्या जागेला ७/१२ वर नोंदणी करण्याचे दायित्व हे बांधकामदार / बिल्डरचे असते. परंतु, काही बिल्डर ते करण्यास टाळाटाळ करतात. यास काही ठिकाणी सदनिकाधारकांचे दुर्लक्ष, माहितीचा अभाव किंवा सभासदांमधील मत-मतांतर हेही कारणीभूत असते. यातूनच सदनिकाधारकांची फसवणूक होते व वेळीच दक्षता न घेतल्याने आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येते. साकेत बाबत नेमके हेच वेगवेगळ्या रूपात घडले आहे - ज्यामुळे आज आपल्या कडे ना OC आहे ना जागेचे हस्तांतरण आपल्या नावे झाले आहे. साकेत च्या बिल्डर वर ACB ने भ्रष्टाचाराची याचिका दाखल केली होती. ती केस कोर्टात 20वर्षे रखडली - यामुळे आपणास सुरवातीस OC मिळाली नाही. 2016 नंतर ही स्थिती बदलली व OC मिळण्याची शक्यता दिसू लागली. पण त्यावेळी सोसायटी च्या काही पदाधिकाऱ्यांनी आपली सत्ता आणि खुर्ची यासाठी अतिशय घाणेरडा विश्वासघातकी ...