सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर
सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर आता तर महाराष्ट्र शासनाने विद्यमान सहकार कायद्याला तिसरी दुरुस्ती केली आहे👍👌 अनेक सोसायटय़ांच्या सभासदांना सोसायटीच्या वतीने सत्यनारायण पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शोज्, क्रीडा स्पर्धा सोसायटय़ांच्या निधीतून साजऱ्या कराव्याशा वाटतात. त्यासाठी सोसायटीचा निधी वापरता येऊ शकतो काय, अशी विचारणा या सोसायटय़ा जिल्हा हौसिंग फेडरेशनकडे करीत असतात. तेव्हा सोसायटीचा निधी अशा कार्यक्रमांना वापरण्याची तरतूद सहकार कायदा किंवा उपविधीमध्ये नसल्याचे सांगावे लागते. मग अशा स्थितीत आम्ही पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजितच करावयाच्या नाहीत काय? असा या सभासदांचा आणि सोसायटय़ांचा प्रश्न असतो. सोसायटय़ांच्या सभासदांनी स्वत: वर्गणी काढून असे कार्यक्रम सोसायटीच्या वतीने साजरे करण्याला सहकार कायदा आणि उपविधी यांचा विरोध नसतो. मात्र स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), महाराष्ट्र दिन (१ मे) या दिवशी राष्ट्रीय ध्वजारोहण प्रसंगी, झेंडय़ाला पुष्पहार, पेढे यासाठी सोसायटी खर्च करू शकते. मात्र या राष्...